Monday, November 10, 2008

राज तुझ्या आंदोलनाची लाज वाटतेः दि.पू.चित्रे

थोडासा नाराज आणि बराचसा शरमिंदा!
- दिलीप पुरुषोत्तम चित्रे

राजसाहेब, तुमचा हा पवित्रा पाहून माझ्यासारखा 'मराठी माणूस' काहीसा नाराज आहे, पण त्याहूनही कितीतरी अधिक शरमिंदा झालेला आहे। आपण आमच्यासारख्या माणसांकडून 'मराठी माणूस'च काय पण एक हिंदुस्थानी नागरिक म्हणवून घेण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. ... अलीकडे लोकांना इतिहासाचा धांडोळा घेण्यापेक्षा वर्तनामानातील ताज्या वास्तवाची चर्चा आवडते. माझ्यासारख्या स्वत:ला थोडाफार बुद्धिजीवी मानणाऱ्या लेखक, कलाकार प्रकृतीच्या माणसाला कधी कधी इतिहासाच्या पानांत हरवून जायला आवडत असले तरी सर्वसामान्य माणसांना मात्र वर्तमानाच्या चौकटीत राहून भविष्याचा विचार करणे जास्त आवडते. गेल्या काही दिवसांत देशभरातील लोकांनी मराठी माणूस हे नाव वारंवार ऐकले. दूरचित्रवाणीवरील सर्व वृत्तवाहिन्यांवर, वर्तमानपत्रांमध्ये त्याची व्यंगचित्रे सगळ्यांनी पाहिली. मुंबई शहर कोणाच्या बापाचे? सारखे सवाल ऐकले. जळणाऱ्या बसगाड्या, रस्त्यावर उतरलेले लोक, दगडफेक पाहिली, नारेबाजी ऐकली. या सगळ्या चचेर्त सतत एका युवा नेत्याची छबीसुद्धा पाहिली. त्या छायाचित्रातील व्यक्तीच देशभरात चचेर्ला कारणीभूत ठरली. राज ठाकरे, हे त्या माणसाचे नाव. वयाने छोटेखानी वाटला तरी मुंबईतील नव्याकोऱ्या विरोधी पक्षाचा हा प्रमुख. त्यानेच भारतीय राज्यघटना, महाराष्ट्र सरकार या दोघांनाही आव्हान दिले-आ बैल मुझे मार! हल्लीच्या राजकारणात हे असेच सुरू आहे. आपणही या सगळ्याला 'रिआलिटी शो' किंवा 'रोड शो'ला मनोरंजनाचे नवे माध्यम मानायला लागलो आहोत. जोवर प्रत्यक्ष आपल्यावर हल्ला होत नाही तोवर या समस्येवर गांभीर्याने विचार करण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही. काश्मीरपासून केरळपर्यंत, गुजरातपासून ओरिसापर्यंत किंवा कर्नाटकपासून आसाम आणि मणिपूरपर्यंत घडत असलेल्या अशा कितीतरी लांच्छनास्पद घडामोडींना आपण 'राजकारण' मानून दुर्लक्ष करतो. एकट्या बिचाऱ्या 'मराठी माणसाला'च आरोपीच्या पिंजऱ्यात कशाला उभे करावयाचे? शेवटी महाराष्ट्र हा ही देशाचाच घटक नाही का? पण, थांबा जरा! राजसाहेबांच्या मते महाराष्ट्र हा जरी भारताचा घटक असला तरी येथे नोकरी-कामधंद्यासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशातून लाखो लोक घुसखोरी करीत आहेत आणि यापुढेही घुसतच राहतील. त्यांना रोखण्याचे काम महाराष्ट्राच्या सरकारने केले नाही तर त्यांचा पक्ष रस्त्यावर उतरून ते करेल. त्यांच्या दृष्टीने हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्ान् आहे. राजकारणात प्रत्येक घटना तिच्या नियोजित वेेळीच होते किंवा घडवून आणली जाते. आगामी काळ हा देशभरात निवडणुकांचा आणि म्हणूनच नेत्यांसमोरच्या आव्हानांचा आहे. सध्या महाराष्ट्रात काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेस यांंचे आघाडी सरकार आहे. त्या दोन पक्षांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. विरोधात शिवसेना आणि भाजप हे समोर उभे ठाकले आहेतच. इतर छोटे-छोटे पक्ष आणि संघटना आपापल्या मतपेढ्यांची पुंजी घेऊन या मोठ्या पक्षांकडे जातील आणि त्यांना परस्परांवर बंदुका चालवण्यासाठी आपापले खांदे भाड्याने देतील. अर्थात, यामुळे महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या परिस्थितीत कायसा फरक पडणार? महाराष्ट्राची संस्कृती तसेच भविष्यातील विकास यावर काय परिमाण होईल? या सगळ्यामुळे महाराष्ट्राची ताकद वाढून दुनियेत महाराष्ट्राचे मोठे नाव होणार आहे का? संत-महंत, ज्ञानी-पंडित, वीर आणि त्यागी नेत्यांची ही महाराष्ट्राची कर्मभूमी हा नवा भार कसा काय पेलू शकेल? राज ठाकरे हे काही शिवाजी महाराज नाहीत किंवा संत तुकारामही नाहीत. ते जयंत नारळीकरही नाहीत किंवा सचिन तेंडुलकरही नाहीत. ते आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे. बाळासाहेबांचा मुलगा नसल्याने शिवसेेनेचे सिंहासन त्यांच्या वाट्याला आले नाही. हा महाराष्ट्रातील एका कुटुंबातील खासगी मामला आहे. आपल्या सर्वांना व्यापून उरणारे ते काही महाभारत नव्हे! राज ठाकरे यांच्या आंदोलनाच्या मागे काही आर्थिक आणि सामाजिक मुद्दे जरूर आहेत. त्यांचे बहुसंख्य समर्थक हे निम्नमध्यम वर्गातले आहेत. राज ठाकरे यांच्या लढाया लढणारे बहुतेक सारे तरुण मागास वर्गातलेच आहेत. 'लुंपेन प्रोलेटरिएट' अशा शब्दांत कार्ल मार्क्स ज्यांचे वर्णन करतो तोच हा वर्ग. या लोकांकडे ना स्वत:ची संपत्ती आहे, ना उत्पन्नाचे काही साधन, ना रोजगार, ना नोकरी. असे देशभरात सुमारे २० टक्के तरी लोक असतील. त्यांचे वयोमान साधारण १७ ते ३० या दरम्यान मानले तर आगामी निवडणुकीत ही एक मोठी व्होट बँक ठरणार आहे. सत्तेची सगळी समीकरणे हे लोक बदलून टाकू शकतात. त्यांचे हे महत्त्व इतर राजकीय पक्षही नाकारू शकत नाहीत. लोकशाही आणि राजकारणाचे इमले जमीनदोस्त करण्याची ताकद या खालच्या स्तरातील तरुणांच्या अंगात आहे. राज ठाकरे एकटेच नाहीत. त्यांच्या पाठीमागेही लोक आहेत. राज ठाकरे यांची मदत घेऊन आत्ता निवडणूक लढवायची आणि एकदा निवडणुका पार पडल्या की त्यांचाही समाचार घ्यायचा, असेही काही बड्यांनी रचलेले कारस्थान या साऱ्यामागे असू शकते. चाळीसएक वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर राज्य करणारे काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि काही उद्योगपतींच्या मदतीने शिवसेना राजकारणात उभी राहिली. तेव्हाही निरपराध माणसांचे प्राण घेणारी, मालमत्तेची नासधूस करणारी हिंसक दंगल मुंबईवर कोसळली होती. तेव्हाचे केंदीय मंत्री मोरारजी देसाई यांना शिवसेनेने मुंबईत 'प्रवेश बंद' केला होता. अखंड तीन दिवस मुंबईत हा तमाशा सुरू होता. तेव्हाही मुंबई पोलिसांनी अशीच बघ्याची भूमिका घेतली होती. वसंतराव नाईक हे इंदिरा गांधी यांचे निष्ठावान सेवक होते आणि इंदिरा गांधी व मोरारजी परस्परांचे वैरी; हे तर आपण सारेच जाणतो. सांप्रतकाळी कोण कोणाचा मित्र आणि कोण शत्रू याचा अंदाज लावणे फारसे कठीण नाही. निवडणुकांपूर्वी छोटे-मोठे राजकीय पक्ष स्वत:ची ताकद आजमावून पाहात आहेत. ममता बॅनजीर्, वायको, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित छुप्या संघटना, सीमी, इंडियन मुजाहिदीन, पश्चिम बंगालमधील डावे कार्यकतेर्- या सगळ्यांच्या आंदोलनाचे, निषेधाचे रोख आणि रंग वेगवेगळे असतील. मात्र, यापैकीही कोणीही आपल्या राजकीय स्वार्थार्साठी भारताच्या राज्यघटनेला आव्हान द्यायला मागेपुढे पाहणार नाही.

* सदर लेख हा १०/११/२००८ च्या महाराष्ट्र टाईम्स मधे प्रकाशीत झाला आहे।
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3689348.cms

Saturday, November 8, 2008

जेथे जातो तेथे। तू माझा सांगाती। चालविशी हाती। धरोनिया॥

Thursday, November 6, 2008

हार्दिक अभिनंदन !!!

स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार जाहीरझाल्याबद्दल अण्णांचे हार्दिक अभिनंदन...!

Wednesday, October 29, 2008

एक विचार

खरच आता ती वेळ आली आहे का ? मागील कही दिवसापासून चालू असलेल मराठी भाषा व मराठी माणसासाठी राज ठाकरे यांच आंदोलन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पहाता मराठी माणूस जागा होतोय अस दिसत। पण ज्या प्रकारे हे आंदोलन सुरु आहे त्याचा नक्की फायदा कोणाला आणि कसा होणार आहे हे पहाणेदेखिल महत्वाचे आहे। पण अशा आक्रामक आंदोलनाची आवश्यकता आहे का ? आता या प्रश्नाला हो आणि नही अशी दोन उत्तरे आहेत। जर या प्रश्नाच उत्तर हो असेल तर आपण विचार करायला हवा आहे, कारण या सर्व गोष्टीत सामान्य माणूसच चेपला जात आहे। आपण या आंदोलनात आपल्याच मालमत्तेचा नुकसान करून घेत आहोत। आता तुम्ही म्हणाल की या सर्व गोष्टीसाठी राज्य शासन जबाबदार आहे आणि शासनाविरोधात हे सर्व कही चालू होत। हे सर्व पटतय पण आपण हा विचार देखिल करा की यात सार्वजनिक मलमत्तेच किती नुकसान झाल आहे? हे सर्व आपण भरलेल्या करातूनच उभ रहिलेल आहे , आणि आता याची परत फेड ही आपल्याच पैशातून करावी लागणार आहे , नाही का ? पण आता दुसर्या बाजूने विचार करू अशा अंदोलानाने आपण दाखवू शकलो कि सामान्य मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र येऊ शकतो। येथे सामान्य मराठी माणूस मुद्दाम लिहिला आहे कारण आपले जे कोणी नेते आहेत ते कधी एकत्र येताना दिसतच नाहीत । सर्वांची तोंड एकमेकांच्या विरोधातच आहेत। आणि तिकडे उत्तरेतले सगळे नेते आणि प्रसार माध्यम एकत्र येऊन महाराष्ट्राविषयी अगदी कहिवाही बोलत आहेत आणि तरीही हे मराठी नेते गप्प आहेत , कारण दिल्लिश्वाराविषयीची त्यांची श्रधा।
आता आपणच सुरवात करायला हवी आहे । म्हणजे करायच अस , आज पासून भाजीआणि इतर वस्तू जरी थोड्या महाग वाटल्या तरीही मराठी माणसाच्या दुकानातूनच घ्यायच्या। इतर बरीच काम आपण मराठी माणसाकडून करून घ्यायची आणि मग बघू हे भैय्ये इथे रहूच कसे शकतात। थोड़ा तरस होइल पण हे आपण आपल्यासाठी करत आहोत हे लक्षात ठेवू.
लिहायच अजून आहे पण आता नंतर ......

मराठी स्पंदन असलेला नवा ब्लॉग

नमस्कार,
मागील काही दिवसापासून एक नविन मराठी ब्लॉग जो मराठी जनासाठी मराठी मनातून स्फूरलेला माय मराठी ब्लॉग चालू करावा असा विचार आम्हा मित्र परिवारामधे चालू होता आणि आज पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर हा ब्लॉग चालू करत आहोत।
हे एक मराठी स्पंदन, मराठी मनाचा ध्यास आहे।
आम्हाला आपल्या प्रतिसादाची एक आस आहे.

धन्यवाद।

आपले,
आपण मराठी